आधीच अल्पभूधारक, डोक्यावर कर्जाचा भार आणि त्यातच अतिवृष्टीमुळं सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पीक हातचं गेलं. यामुळं पुढं काय होणार या विवंचनेतून थोडगा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील भास्कर रावसाहेब तरडे यांनी मृत्यूला कवटाळलं. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घरातील कर्त्या व्यक्तीची आत्महत्या हा त्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का असतो.