ढवळगाव फाटा येथे जय मल्हार पानटपरीवर धाड – २ लाख ४२ हजारांचा गुटखा साठा जप्त श्रीगोंदा (प्रतिनिधी) : गुटखा, पान मसाला, मावा व अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ढवळगाव फाटा परिसरातील जय मल्हार पान टपरी वर सोमवारी रात्री साडेदहा वाजता छापा टाकण्यात आला. या कारवाईत तब्बल २ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखूचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला.