23 ऑगस्टला दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बेलतरोडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनीष नगर येथून हद्दपार आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव सुनील गायकवाड असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक दोनशे रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला. आरोपीला शहरातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. आरोपीने या आदेशाचे उल्लंघन केले आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.