गडचिरोली : चामोशी, विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोशी तालुक्यातील पवित्र तिर्थक्षेत्र मार्कंडा देव येथे शिवलिंग स्थापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . जय संतोषी मॉ शक्तिपीठ संस्थानच्या वतीने निर्मित भगवान महर्षी मार्कंडेय शिव मंदिरात हे धार्मिक कार्य पार पडणार असून १५ सप्टेंबरला सकाळी ७:३० वाजता पूजन, अभिषेक व शिवलिंग स्थापन केली जाणार आहे