पोलीस निरीक्षक दिपक लांडे यांनी 21 ऑगस्ट रोजी बार्शीत 692 किलो गांजा जप्त करून धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक अशोक सायकर यांनी केले. यावेळी जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पोलिसांचे कौतुक करत, “महाराष्ट्रातील पोलिसांवर गंभीर आरोप करणारे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या उंचीचे भान ठेवावे. पोलिस प्रशासन सतर्कतेने काम करत असून त्यांच्यावर केलेले आरोप तथ्यहीन आहेत, असे पाटील यांनी शनिवारी सायं. 5 वाजता म्हणाले.