अक्कलकुवा तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या उपस्थितीत १० सप्टेंबर रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयावर आंदोलन छेडले होते. अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली होती. आंदोलनाचे दखल घेत ११ सप्टेंबर रोजी कृषी सेवा केंद्रातून तालुक्यातील शेतकऱ्यांना युरियाचा वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.