जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करून असलेल्या हजारो कुटुंबांना त्या जागेचा मालकी हक्क मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. या अतिक्रमणधारक नागरिकांना सुधारित शासन निर्णयानुसार तातडीने घरांचे कायदेशीर मालकी हक्क (पट्टे) मिळावेत, यासाठी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.