अंबड महसूल प्रशासनाची अवैध गौणखनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ट्रॅक्टर जप्त. अंबड, दि. १० सप्टेंबर २०२५ अंबड तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. आज दुपारी एका धाडसी कारवाईत, सुमारे ४० किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करून वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यावेळी आरोपींनी अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याची धमकीही दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी क