गंभीर गुन्हेगारी आरोपांवरून अटक केलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्र्यांना काढून टाकण्याच्या विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आज शनिवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला राजकारणात स्वच्छता हवी आहे आणि राजकारण्यांनी भ्रष्टाचारापासून दूर राहावे अशी इच्छा आहे. सरकार २०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. सरकारच्या प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार दिसून येते.