सणांच्या पार्श्वभूमीवर अमजद अकबर खान यांचा महापालिकेला अल्टिमेटम... रस्ते, लाईट, फॉगिंग आणि नागरी समस्यांकडे त्वरित लक्ष द्या! जालना : गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आजा दि.26 मंगळवार रोजी दुपारी 12:00 वा. च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते अमजद खान अकबर खान यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन आज जालना महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलं.