कोहमारा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या सडक/अर्जुनी तालुक्यातील भदुटोला येथे शनिवार दिनांक ६ सप्टेंबरला दुपारच्या दरम्यान पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केला आहे.स्थानिक शेतकरी रामू मन्साराम कापगते (वय 42) हे शेतात काम करीत असताना अचानक वाघाने त्यांच्या पाठीवर झडप घातली. त्यांचा आरडाओरडाचा आवाज ऐकून गावकरी धावून आले, व गावकऱ्यांनी काठ्यांच्या सहाय्याने वाघाला पळवून लावले. मात्र वाघ उसाच्या वाळीत जाऊन लपला.