पोलीस उपायुक्त सिंगा ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार,धम्म कीर्ती नगर येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात मुक्कामी असलेले भंतेजी नामदेवराव तन्हाणकर यांच्या घरी अज्ञात आरोपीने घरफोडी करून ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेनंतर वाडी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत आरोपींना अटक केली आहे.अटकेतील मुख्य आरोपीचे नाव करण उर्फ क्रिश पाल आहे.