सध्या पंजाब राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो गावे पाण्याखाली गेली असून लाखो लोक बेघर झाले आहेत. अशा संकटाच्या काळात देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला असून, ठाण्याजवळच्या मुंब्रा शहरानेही माणुसकीचा अनोखा संदेश देत पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8च्या सुमारास मदतीचा हात पुढे केला आहे. मुंब्रामधील अनेक सामाजिक संस्था, राजकीय नेते आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेतली.