सांगोला शहरातील एका हॉटेल समोर दुचाकीवरून घरी सोडण्याच्या कारणावरून चौघांनी मिळून शिवीगाळ करीत दोघा मित्रांना जबर मारहाण केली तर लोखंडी रॉड डोक्यात मारून एकास जखमी केले. याबाबत प्रतीक स्वप्निल सतारले (रा. नवीन वसाहत मिरज रोड, सांगोला) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुमित डंबळ, किशोर बनकर, अजय बोत्रे व उज्ज्वल नागणे (सर्व रा. सांगोला) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.