समृद्धी महामार्गावर हरविलेली तीन वर्षीय रुद्राक्षी ही बालिका ग्रामीण गुन्हे शाखा अमरावती व मंगरुळ चवाळा पोलिस ठाण्याच्या वेगवान कारवाईत अवघ्या तीन तासांत सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आली. एका प्रवाशाला महामार्गावर ही बालिका एकटी दिसल्याने त्याने तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलगी बोलू शकत नसल्याने तिची ओळख पटविणे अवघड झाले. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांनी तातडीने तिचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. टोल नाक्यांवर माहिती देऊ