सांगोला शहरातील कोपटे वस्ती येथील एका वाळू चोरट्याला, सांगोला पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. पप्पू शिवाजी इंगोले वय ३२ रा. कोपटे वस्ती सांगोला असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव असून , त्याच्यावर १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्या आदेशान्वये पप्पू शिवाजी इंगोले यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले इ. कलम ३ (१) अन्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. सध्या त्याला पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल केले आहे.