धुळे पोलिसांच्या भरोसा सेलने कौटुंबिक कलह आणि पती-पत्नीतील वादांमुळे तुटण्याच्या मार्गावर असलेल्या तब्बल १६० कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. यंदा साडेसहाशे तक्रारींपैकी १६० प्रकरणे यशस्वीरीत्या हाताळून समुपदेशनाद्वारे गैरसमज दूर करण्यात आले. प्रभारी अधिकारी पीएसआय कल्याणी पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील या कामगिरीस पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून, सामाजिक सलोखा जपण्यासाठी या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.