घुस्सर येथील नागरिकांनी गावातील बस सेवा व पाणीपुरवठा यासह अनेक तातडीच्या समस्या सोडविण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता आमदार संजय गायकवाड यांच्या भेट घेऊन मांडल्या.बससेवेच्या समस्येवर उपाययोजना करताना त्यांनी विभागीय नियंत्रक शिरसाठ मॅडम यांच्याशी थेट भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्वरित बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐकल्यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांना संपर्क करून गावकऱ्यांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या.