माणगाव येथे 'क्षत्रिय मराठा भवन' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याचा आज शनिवारी दुपारी २ च्या सुमारास खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते शुभारंभ पार पडला. हे भवन मराठा समाजाच्या एकजूटीस, सक्षमीकरणास आणि विविध सामाजिक उपक्रमांना दिशा देणारे प्रभावी केंद्र ठरेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. हे भवन केवळ एक वास्तू न राहता, मराठा समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे व आधुनिक प्रगतीचे प्रतीक ठरेल.