गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या आलापल्ली येथील श्रीराम मंदिरात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. हा अनोखा उत्सव चिमुकल्यांसाठी खास असतो, कारण या दिवशी लहान नंदीबैल सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. यंदाही या सोहळ्यात पालकांसह चिमुकल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. यावेळी मंदिराच्या परिसरात विविध प्रकारचे सुंदर आणि रंगीबेरंगी देखावे तयार करण्यात आले होते.