माजलगाव धरणाच्या दरवाजा खालील पुलावर आज शनिवार दि 27 सप्टेंबर रोजी, दुपारी 3 वाजता,एक गंभीर घटना घडली. एका शेतकरी दुचाकीवरून जात असताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात तो अडकला. परिस्थिती बिकट होत असतानाच देवखेडा येथील तरुणांनी तत्परतेने मदतीचा हात दिला. शेतकऱ्याची दुचाकी पाण्याच्या वेगात वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी ती पुलालगत घट्ट बांधून ठेवली. याच वेळी शेतकऱ्याला सुरक्षित बाहेर काढण्यात तरुणांना यश आले. दरम्यान पावसाचा जोर वाढला असून सतर्कता बाळगावी असा आवाहन माजलगाव तालुका प्रशासनाकड