आज हरितालिका व्रत आहे. प्राचीन काळापासून विवाहिते च्या जीवनात या व्रताचे मोठे महत्त्व असून आपल्या पतीच्या सुख-समृद्धीसाठी हे व्रत ठेवल्या जाते. या पार्श्वभूमीवर आज उमरेड तालुक्यातील प्राचीन गाव तलावावर विवाहितांची व कुमारीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सुवासिनी महिलांनी मोठा उत्साह साजरा केला.