भंडारा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री डॉ पंकज भोयर आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी भंडारा जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी दिल्या. विशेषता ही भेट त्यांची पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात होती. त्यांनी विविध विभागांचा आढावा देखील घेतला. भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्याच्या नावानियुक्त पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भंडारा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.