वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य असून सर्वसामान्य नागरिकांना बिल्डरांनी फसवलं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी. अनधिकृत बांधकामांबाबत शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. ठाण्यात ज्याप्रमाणे क्लस्टर योजना राबविण्यात आली त्याप्रमाणे या परिसरात देखील क्लस्टर सारखी योजना राबवावी लागेल याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा करेन अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.