गडचिरोली पोलिसांनी एका जहाल माओवादी शंकर ऊर्फ अरुण येर्रा मिच्चा याला हैदराबादमधून अटक केली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये मौजा कापेवंचा येथे रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.