सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ९, ११, १२ व १३ ची प्रारूप रचना अव्यवहार्य आणि अन्यायकारक असल्याचे नागरिक हित समूह व प्रबोधन सेना यांच्या वतीने महापालिकेकडे हरकत बुधवारी दाखल करण्यात आली आहे. ॲड. सुरेश गायकवाड यांनी बुधवारी सायं 5 वाजता पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रभाग रचनेत नैसर्गिक मर्यादा, नागरिकांचे हित, भाषिक समतोल यांचा विचार न करता विस्कळीतपणे विभागणी केली गेली आहे.