माढा तालुक्यातील कुई येथील मुरुम उपसा प्रकरणातील वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. आयपीएस अधिकारी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अजितदादांना फोन करणारा कार्यकर्ता नशा करतानाचाही व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्या पाठोपाठ आता ग्रामस्थ महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावतानाचा व्हिडिओ ९ सप्टेंबर सकाळी 11:00 वाजल्यापासून व्हायरल झाला आहे.