रिक्षातील टेपचा आवाज कमी न केल्यान टोळक्याने हत्याराने तरुणाला मारहाण करुन गंभीर जखमी करण्याचा प्रकार वानवडीमध्ये घडला होता. तेव्हापासून गेली ३ महिने पोलिसांना गुंगारा देणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद केले आहे. ऋषिकेश सुनील बागुल (वय २७, रा. एस आर ए, बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) असे या गुंडाचे नाव आहे.