उदगीर तालुक्यातील धडकनाळ बोरगांव येथे अतिवृष्टीमुळे शेतकरी, व गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहेत त्याच बरोबर शेतकऱ्यांची अनेक जनावरे मृत्यू पावली आहेत, नुकसान ग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी उबाठा गट शिवसेनेच्या वतीने तहसीलदार राम बोरगावकर यांच्याकडे करण्यात आली आहे.यावेळी कैलास पाटील उपजिल्हा प्रमुख,प्रकाश हैभतपुरे जिल्हा समन्वयक,शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मोरे, सचिन साबणे,व्यंकंट साबणे,बालाजी सोनाळे,शिवकांत चेटनाळे,गोविंद बेंबडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.