वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचा समारोप 'निरोगी जीवनशैली' चा संदेश देत एका भव्य सायकल रॅलीने करण्यात आल्याचे आज 31ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे