📰 मोहा गावात सरकारी कामात अडथळा – ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल धाराशिव, दि. 27 ऑगस्ट : मोहा (ता. कळंब) येथे स्मशानभूमीची हद्द निश्चित करण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी पाहणीस गेले असता गावातील काही लोकांनी अडथळा निर्माण केला. या प्रकरणी तब्बल ३० ते ३५ जणांविरुद्ध कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी गोविंद राजाभाऊ मोटेगावकर यांच्या तक्रारीनुसार, दि. 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. गट नं. 529 मधील गावठाण जमिनीवर तहसीलदार पाहणी करत असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. पोलिसांन