शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे, अशा शेतकऱ्यांनी पंढरपूर पंचायत समिती येथे आपल्या अर्जासह दिनांक 8 सप्टेंबर रोजी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले आहे आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत आवाहन केले आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांना बँकांकडून अडवणूक करून कर्ज देण्यात येत नसल्याचे त्यांनी सांगितले.