गोरेगाव तालुक्यातील सोनी येथे शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सोनी येथील आकरवर पोळा भरविण्यात आला. यानंतर विधिवत पूजा अर्चना करून पोळा फोडण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी बैलजोडीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य बैलांना भरविला.तसेच त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. बैलपोळ्या निमित्त सोनी येथील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.यावेळी मोठ्या संख्येत बैलपोळ्यात गावातील गणमान्य नागरिक शेतकरी यांनी सहभाग नोंदविला होता.