विटा ता. खानापूर येथील बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोयीबाबत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले होते अनुसरून विटा ता. खानापूर येथील बसस्थानकाचे बांधकाम करणेकरिता जुन्या इमारतीचे पाडकाम गेल्या वर्षी केले आहे. नवीन बांधकाम संथगतीने चालू आहे. बस स्थानकात सर्वत्र खड्डे व चिखल झाला असून त्यातूनच प्रवाशांना चालावे लागत आहे. शौचालय रात्री बंद असते, पिण्याच्या पाण्याची सोय नाही प्रवाशांना बसण्यास जागा नाही त्यामुळे वैभव दादांनी प्रयत्न केले होते आज परत रस्त्याचे काम गतीने चालू होऊन त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे