गोर बंजारा समाजाचा राज्य सरकारने अनुसुचित जमातीत समावेश करावा आणि त्यांना अनुसुचित जमातीच्या सुविधा उपलबध्द करुन देण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली असून मंगळवार दि. 9 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. गोर बंजारा समाज हा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास असून हैद्राबाद गॅझेटनुसार हा समाज अनुसुचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र आहे.