गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी मुंबई भाजपातर्फे मोफत बससेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आज शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांच्याहस्ते बीकेसी मैदानातून या बसेसना भगवा झेंडा दाखवत कोकणच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी उपस्थित मंत्री आशिष शेलार यांनी सर्वांशी संवाद साधला आणि सर्व कोकणवासीयांना आणि गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर उपस्थित होते.