सरळ गाव शिवारात मागील दोन महिन्यापासून अवैध रेतीचा उपसा सुरू आहे.ग्रामस्थांनी याबाबत हटकले असता रेती तस्करांनी धमकी देत जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकी देणाऱ्या वाळू तस्कराविरोधात तत्काळ कार्यवाही व्हावी या मागणीसाठी सरुळ ग्रामस्थांनी आज दिनांक 22 सप्टेंबरला तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार मीरा पागोरे यांना निवेदन दिले.निवेदनावर सरपंच हिराबाई कापसे,उपसरपंच राहुल वाघ यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.