शहरातील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात महागड्या स्पोर्ट बाईकवर येत मोठ्याने हॉर्न वाजवत मुलींना त्रास देऊन धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांवर आता पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. सिडको येथील एमजीएम कॉलेज परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर आयटी ऍक्ट आणि विनयभंगासह तब्बल १४ गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला