आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वार शनिवार रोजी दुपारी 3वाजता बदनापूर ता.सोमठाणा येथे गावकऱ्यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी कबड्डी स्पर्धेची आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आले असून यावेळी आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर शहरातील व परिसरातून आलेल्या कबड्डी स्पर्धकांशी संवाद साधत उद्घाटन केले आहे,यावेळी सोमठाणा येथील गावकरी भाजपा पदाधिकारी व कबड्डी स्पर्धक उपस्थित होते.