सासुरे येथे झालेल्या गोविंद बर्गे यांच्या गोळीबार प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आत्महत्या की हत्या,या संशयात अडकलेल्या या प्रकरणातील मूळ बुलेट अखेर पोलिसांच्या हाती लागली. ही बुलेट घटनास्थळी न सापडता, नंतर जप्त केलेल्या कारमध्ये आढळून आल्याची माहिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी 12 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दिली. नर्तिका पूजा गायकवाड हिने मिरगणे प्लॉटिंगमध्ये ७ लाख रुपये खर्चून एक प्लॉट खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.