राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट ) भुसावळ तालुका अध्यक्ष पदी विशाल रविंद्र नारखेडे तर शहराध्यक्ष पदी हाजी अशरफ खान यांची निवड करण्यात आली आहे . सदरची निवड जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी केले आहे. भुसावळ येथे माजी आमदार संतोष चौधरी यांच्या कार्यालयात दि. 25 रोजी सायंकाळी पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी सचिन चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली.