स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय शुक्रवारी दुपारी जाहीर झाला आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी प्रसिद्ध केली असून, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात (OBC) गटासाठी राखीव करण्यात आले आहे. राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांपैकी विविध गटांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.