मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप ! आज मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्यांचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला भक्कम आधार मिळाला आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेतून राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे