मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरावरून दोन गटांत वाद उफाळून आला. तुफान हाणामारी झाली. बाबू लॉज चौकात बुधवारी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणात परस्परविरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गटांतील ४० हून अधिक आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. तर पोलिसांनी सामाजिक शांततेचा भंग केल्याची वेगळी फिर्याद दिल्याने आधीच गुन्हे दाखल झालेल्या २१ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्ह्यांची नोंद केली.