गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याआधी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सदावर्ते यांनी कायद्याचा आधार घेत जरांगे यांच्याविरोधात दंड थोपडले आहेत. जरांगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.