एक सप्टेंबरला दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर माहेर वाशिम गौराईचे रविवारी पारंपारिक प्रथेनुसार आगमन झाले आहे. दरम्यान एक सप्टेंबरला या गौरीचे पूजन झाले. दरम्यान श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांच्या सीनियर भोसला पॅलेस येथे इसवी सन 1728 पासून सुरू असलेली अखंडित परंपरा जपत आज या महालक्ष्मीची पूजन करण्यात आले. येथे 297 वर्ष जुन्या चांदीच्या श्री महालक्ष्मी जुन्या अलंकारासहित स्थापित केल्या जातात.