आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्याकरीता आज दि.२५ आगस्ट सोमवार रोजी दूपारी १ ते ४ वाजेदरम्यान उपविभागीय कार्यालय देसाईगंज समोर, आमदार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अखिल भारतीय युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकर्रांचा मोर्चा काढत कार्यालयासमोरच घंटानाद आंदोलन करण्यात आले.