शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान एका संशयित तरुणास प्रभू रोड येथे शुक्रवारी (दि.२२) पहाटे २:१५ वाजता ताब्यात घेतले. प्रभू रोड येथे पोलिस पथक गस्त घालत असताना एक तरुण आपले अस्तित्व लपवून बसलेला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. रुपेश ऊर्फ विक्की ऊर्फ विडो राजू बोरकर (२७, रा. अंगोली बुद्ध विहारजवळ, कामगार नगर, कामठी) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयि