भिवापूर येथील मरु नदीच्या पुलावरून खोल नदीपात्रात कार कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता. या मृतकाचे नाव सागर वाघमारे असे सांगण्यात आले आहे. यांचे उमरेड येथे हॉटेल आहे. सागर यांची कार भरधाव वेगाने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे कारण ही कार सुरक्षेसाठी ठेवलेले लोखंडी ड्रम व पुलावरील सुरक्षा कठडे तोडून नदीपात्रात कोसळली होती. सागरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर सागरच्या डोक्यावर किरकोळ जखम आढळली आहे