Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
छत्रपती संभाजीनगर: पती पासून विभक्त २४ वर्षीय चरणीला अनैतिक संबंधातून गर्भधारणा झाली. कुटुंबाला कळू नये म्हणून तिने गावी जाऊन स्वतःच बाळाला जन्म दिला. कुटुंबाला ही बाब कळू नये म्हणून जन्मदात्या आईनेच चिमुकल्याला पोत्यात भरून डिव्हायडरच्या कचऱ्यात फेकलं.मोकाट कुत्र्यांनी ढिगार्यातून पोतं रस्त्यात आणलं. प्रकार शहरातील पुंडलिक नगर येथे उघडकीस आला आहे.